शिक्षण म्हणजे मुलांना ‘शिकवून काढणं’ नसून स्थानिक संस्कृतीविषयी संवेदनशील राहून, ‘शिकायचं कसं’ यासाठी तयार करणं, हा विचार या पुस्तकातून पुन्हा पुन्हा आपल्यासमोर येतो
हे पुस्तक शिक्षण क्षेत्रातल्या महत्त्वाच्या अशा भाषाशिक्षण, गणितशिक्षण, शिक्षणातील मूल्यं, भाषा आणि सत्ता, लोकशाहीचं शिक्षण परीक्षांचं ‘व्यसन’, ज्ञानरचनावाद, बालसाहित्य आणि त्याचं शिक्षणातलं स्थान, संस्कृतीसापेक्ष संवेदनशील शिक्षण, ऑनलाइन शिक्षण, मध्यमवर्गीय मुलांसाठीची शाळानिवड, शिक्षणाचं माध्यम अशा अनेक विषयांचा ऊहापोह करतं. ‘निगुतीच्या बालककेंद्री शिक्षणा’चं महत्त्व अधोरेखित करण्याचं काम करतं.......